
मोदींची १२ वर्ष म्हणजे राष्ट्रनिर्माणाचा सुवर्णकाळ’ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने जागतिक स्तरावर नवे स्थान निर्माण केले असून हा काळ ’राष्ट्रनिर्माणाचा सुवर्णकाळ’ ठरल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित ’राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०२६ रोजी पंतप्रधानपदावरील कार्यकाळाची १२ वर्षे पूर्ण करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनिल राणे आदी
उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवता येते, हे मोदीजींनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केले आहे. अनुदानाधारित मानसिक ते ऐवजी स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत उभारण्याचे काम त्यांनी केले.’ ’मेक इन इंडिया’ ते ’मेक फॉर वर्ल्ड’ या प्रवासामध्ये मोदींचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी भारताला जागतिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने नेल्याचे गौरवोदगार काढले.www.konkantoday.com




