चिपळुणातील अनधिकृत बांधकाम तत्काळ तोडण्याचे नगर परिषदेचे आदेश


चिपळूण शहरातील शंकरवाडी येथे वाशिष्ठी नदीला बांधलेल्या नलावडे बंधार्‍याला लागूनच बांधकाम करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाला नगरपरिषदेने नोटीस धाडून बांधकाम तत्काळ तोडण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रत्यक्ष जाऊन काम थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. नगरसेवक संदीप भिसे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे.
या बंधार्‍याला लागूनच असलेल्या खासगी जागेत एक बांधकाम व्यावसायिक गृह प्रकल्प साकारत आहे. त्यासाठी त्याने बांधकाम सुरू केले आहे. हे काम करताना त्याने बंधार्‍यालाच बांधकाम केले आहे. तसेच याच भागात असलेला मुख्य नालाही बुजवला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button