बाळमाने पुन्हा आमदारकी निवडणुकीच्या रिंगणात, महाविकास आघाडीकडून बाळ माने यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर


रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीकडून जागा वाटपासाठी मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यात ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर बाळ माने यांनी सिद्धिविनायक चरणी नतमस्तक होत रत्नागिरीकडे प्रस्थान केले.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना माजी मंत्री अनंतराव गीते, शिवसेना आमदार भास्कर जाधव, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळाली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा, उद्धवसाहेबांचे आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. रत्नागिरीच्या व संपूर्ण कोकण वासियांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button