रत्नागिरीतील साईनगर-कुवारबांव येथील खून प्रकरणी ’त्या’ मैत्रिणीच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा


एका वर्षापूर्वीच्या आर्थिक वादाची ठिणगी आणि मैत्रिणीला आपल्याविरुद्ध भडकवित असल्याचा राग मनात धरून, कुवारबाव-साईनगर येथे अवघ्या २५ वर्षांच्या सुरज राजाराम झोरे या तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निघृण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण रत्नागिरी हादरवून सोडणार्‍या या खून प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या घटनेची मुख्य प्रत्यक्षदर्शी असलेली आणि मुख्य आरोपी सोहमची मैत्रीण अखेर मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली असून, पोलिसांनी तिला थेट गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन महत्त्वाचा पंचनामा केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button