नेवरे खाडीत मासेमारीस गेलेल्या व्यक्तीचा आढळला मृतदेह


रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवरे खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ढोकमळे येथील संजय गावडे (वय ५४) हे मासेमारीसाठी नेवरे खाडीत गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी व स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी नेवरे खाडीच्या किनार्‍यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button