मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे महामार्गाच्या साईडपट्ट्या धाेकादायक


मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ परिसरात महामार्गाच्या साईडपट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साईडपट्ट्या धाेकादायक बनल्या असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याशिवाय प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने नागरिकांना उन्हाळा व पावसाळ्यात माेठा त्रास न सहन करावा लागत आहे.
तुरळ परिसरात कडवई तसेच इतर गावाकडे ये-जा करण्यासाठी सुरक्षित
उड्डाणपूल नसल्याने स्थानिकांना जीव धाेक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा आहे. लागल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला. महामार्ग चाैपदरीकरणाचे काम सुरू असतानाही सुरक्षिततेच्या उपाययाेजना करण्यात दुर्लक्ष हाेत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन सादर केले असून संबंधित ठेकेदाराने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button