चित्रपट महामंडळाच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट! ऐन निवडणुकीत नीलम शिर्केंची माघार


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणुकीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट झाल्यापासून सुरू झालेला हा वाद आणि त्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतलेली आक्रमक एन्ट्री, यामुळे संपूर्ण वातावरण तापले होते.मंत्र्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी अख्खी सरकारी यंत्रणा राबत आहे,” असा थेट आरोप अंधारेंनी केला होता. मात्र, आता या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या नीलम शिर्के यांनी निवडणुकीतून थेट माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीला पूर्णविराम देत नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, त्या या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. एवढंच नाही, तर त्यांनी या निवडणुकीत उभ्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि मावळत्या संचालिका वर्षा उसगांवकर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. अधिकृतपणे त्या ही कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या एका निर्णयामुळे विरोधकांच्या हातातील सर्वात मोठा मुद्दा गळून पडला असून, निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button