
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी फाटा येथे जिवंत २९ गावठी बॉम्ब पोलिसांकडून नष्ट
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी फाटा येथे आढळून आलेले २९ जिवंत गावठी बॉम्ब पोलिसांच्या बॉम्ब शोध व नाश पथकाकडून नष्ट करण्यात आले. मंगळवारी सकाळी या गावठी बॉम्बच्या स्फोटामुळे रेश्मा प्रमोद सुर्वे (४७, रा. जांभारी फाटा, रत्नागिरी) या गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखत घेत जयगड पोलिसांत बॉम्ब ठेवणार्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच घटनास्थळी आढळून आलेले बॉम्ब नष्ट केले.
रेश्मा सुर्वे या १९ मे रोजी जांभारी फाटा येतील भूत बंगल्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत कलक तोडण्यासाठी गेल्या होत्या. कलक तोडत असलेल्या जागेमध्ये कोणी तर अज्ञाताने जंगली प्राण्यांना मारण्यासाठी गावठी हातबॉम्ब उघड्यावर टाकले होते. त्या गावठी बॉम्ब रेश्मा यांनी हातात पकडल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. बीडीडीएस पथक व फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याठिकाणी आढळून आलेले २९ गावठी बॉम्ब न्यायालयाच्या परवानगीने पोलिसांकडून नष्ट करण्यात आले, याप्रकरणी जयगड पोलीस ठाणे बेथे अज्ञात इस्मविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८८ हे सह भारतीय बारी पदार्थ अधिनियम कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com




