रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी ’मुख्यमंत्री सहायता निधी’ मोठा दिलासा


गंभीर आजार आणि उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी ’मुख्यमंत्री सहायता निधी’ मोठा दिलासा ठरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार १०९ रुग्णांना थेट आर्थिक मदत मिळवून देण्यात यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकूण १६१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अत्यंत गरजू १०९ रुग्णांना उपचारासाठी एकूण ७५ लाख ९० हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. या योजनेअंतर्गत आजाराचे गांभीर्य आणि उपचारांचा खर्च लक्षात घेऊन पारदर्शक पद्धतीने आर्थिक साहाय्य देण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button