
लांजा तालुक्यात विनापरवाना विदेशी दारूविक्री, महिलेवर गुन्हा
विनापरवाना विदेशी दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलीसांनी कोंडगे पहिलीवाडी येथील ६० वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडगे पहिलीवाडी येथे एक महिला विदेशी दारूची विनापरवाना विक्री करत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी बुधवारी २० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोंडगे पहिलीवाडी येथे धाड टाकली. यावेळी वैशाली गणेश कदम (६०, रा. कोंडगे पहिलीवाडी, ता. लांजा) ही विदेशी मद्याच्या दारू साठ्यासह आढळून आली.
www.konkantoday.com




