
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे कपडे विक्रीच्या वादातून तरुणाला मारहाण
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे कपड्यांची विक्री करणार्या दुकानदारांच्या वादातून तरुणाला लोखंडी सळ्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. अनिल विसंबर यादव (३०, रा. उत्तर प्रदेश. सध्या. रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पप्पू आणि सुरेश (पूर्ण नाव माहित नाही.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




