शिक्षकांना मे महिन्याचा संपूर्ण प्रवास भत्ता द्या, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मे महिन्याचा संपूर्ण प्रवास भत्ता देण्यात यावा, अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मे महिन्याच्या वेतनात प्रवास भत्ता नियमितपणे समाविष्ट केला जात नसल्याची बाब त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. मात्र, सध्या राज्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना बी.एल.ओ. तसेच जनगणनेची जबाबदारी देण्यात आली आहे. या कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातत्याने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना प्रवास भत्ता मिळणे आवश्यक असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षकांना शाळेच्या सुट्ट्यांदरम्यानही विविध शासकीय कामांसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवास करूनही मे महिन्यातील प्रवास भत्ता न मिळाल्याने आर्थिक ताण निर्माण होत असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button