
अवकाळी पाऊस तसेच डिझेलच्या समस्येमुळे मच्छीमार बांधव शेवटच्या हंगामात अडचणीत
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यांच्या संकटामुळे तसेच डिझेलच्या समस्येमुळे मच्छीमार बांधवांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. समुद्रात निर्माण झालेल्या वाळसदृश परिस्थितीमुळे मासेमारीवर याचा थेट परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नौका मालकांनी आपल्या बोटी किनार्यावरच सुरक्षित ठेवणे पसंत केले आहे.
रत्नागिरीसह शेजारील जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. सध्या समुद्रात वार्यांचा वेग प्रचंड असल्याने मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे जीवाचा धोका न पत्करता मच्छीमार सध्या जवळपासच मासेमारी करत आहेत. तर सुमारे १५० ते २०० बोटी हर्णे किनार्यावर आहेत. त्यामुळे सध्या इतर मच्छीची आवक कमी झाली असून फक्त कोळंबी मिळत असल्याचे मच्छीमार महेंद्र चौगले यांनी सांगितले.
www.konkantoday.com




