
गुहागर नगरपंचायतीने अखेर गुहागर किनारी ६ जीवरक्षकांची नेमणूक
गुहागर नगरपंचायतीने अखेर सहा किलोमीटरच्या येथील समुद्रकिनारी सहा जीव रक्षकांची नेमणूक केली असून पर्यटकांना सुरक्षा कवच निर्माण केले आहे मात्र हे करत असताना नगरपंचायतीच्या एकूण निधी पैकी सुमारे ४० टक्के निधी यावरच खर्च होत असल्याने या निधीवर ताण येत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याकरिता पर्यटनमंत्र्यांची ६ रोजी भेट घेतली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली असताना निविदेची मुदत संपल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच जीव रक्षक एक मेपासून कमी करण्यात आले होते.
www.konkantoday.com




