
रत्नागिरीकरांना दिलासा, रत्नागिरीतील शीळ धरणात ५० दिवसांचा पाणीसाठा
वाढत्या तापमानामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शीळ धरणामध्ये पुढील सुमारे ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याने सध्या तरी शहरावर पाणीटंचाईचे सावट टळले आहे. त्यामुळे ऐन ऊन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, १५. मेनंतर धरणातील पाण्याची पातळी आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या शहरातील प्रत्येक विभागात दररोज सुमारे दीड तास सामीपुरवठा केला जात असून गरज भासल्यास तो एक तासावर आणण्याचा विचार आहे. रत्नागिरीत उष्णतेचा कडाका वाढत असून त्याचा परिणाम शीळ धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. दररोज पाण्याची पातळी कमी होत असल्याने भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. मागील दोन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे पानवल धरणातून शहराला पाणीपुरवठा होत नसल्याने संपूर्ण भार शीळ धरणावरच आहे.www.konkantoday.com




