आता चिपळूण नगर परिषद आपला कारभार नाट्यगृह आणि शॉपिंग सेंटरमधून हाकणार


चिपळूण नगरपरिषदेचा कारभार इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. न. प. ची दुसरी जीर्ण इमारत पाडण्यासाठी लवकरच ई-निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच नव्या इमारतीसाठी मंजूर झालेल्या ११ कोटी रुपयांतील २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याने या कामालाही तातडीने सुरुवात केली जाणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. यावेळी प्रशासनाने नगर परिषदेची एक जीर्ण इमारत पाडण्यात आली असून दुसरी इमारत १९४२ साली साकारण्यात आली आहे. तीही जीर्ण झाली असल्याने त्या जागी नवी इमारत बांधण्यासाठी १२ कोटी ४७ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून इमारत उभारणीसाठीच्या सर्व मान्यता मिळाल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button