
सुट्टीचा हंगाम व पर्यटकांमुळे मागणी वाढल्याने सीएनजी, पेट्रोलचा तुटवडा
सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने साहजिकच महामार्गावरून धावणार्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पेट्रोल व सीएनजीची मागणीही वाढली असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. यामुळे वाहन चालकांना रांगाचा सामना करावा कागत असल्याने नाराजी व्यक्त हीत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची पाऊले कोकणकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन धावणार्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यातील बहुतांशी पर्यटक नाश्ता व जेवण करण्यासाठी येथे आवर्जून थांबत आहेत. त्यामुळे पेट्रोल व सीएनजी भरुन घेण्यासाठी येथील -प्पांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत.www.konkantoday.com




