
आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अणुस्कुरा घाटमार्ग दुरुस्तीला ५ कोटींचा निधी
पुराव्यामुळे अणुस्कुरा घाटमार्ग दुरुस्तीला ५ कोटींचा निधी मंजूर
राजापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या अणुस्कुरा घाट मार्गाला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग आता खड्डेमुक्त होणार आहे.
अणुस्कुरा ते ओणी या ३३ किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याची प्रचंड चाळण झाली होती. पावसाळ्यात हा प्रवास जीवघेणा ठरत होता. आता मंजूर झालेल्या ५ निधीतून यातील २५ किलोमीटर अंतराचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण केले जाणार आहे सध्या हा प्रस्ताव अंतिम तांत्रिक मंजुरीच्या टप्यात आहे.
www.konkantoday.com




