राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा – ॲड. असिम सरोदे


पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारले आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावे, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केला.

सरकारने नसरापूर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा केली आहे. यावरही राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. सरकारने जलदगती न्यायालयाची व्याख्या सांगावी. या घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचे, त्यांचे शोषण करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून ते सतत वाढत आहे. याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचे, मुलींचे शोषण करणाऱ्यांविरोधात सरकार का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी केला.

या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलेही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा – ॲड. असिम सरोदे

राज ठाकरे यांच्या भूमिकेवर ॲड. असिम सरोदे यांनी त्यांच्याविरोधा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नसरापूर प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार १०० टक्के फाशीची शिक्षा होईल, पण ती होण्याआधी त्यांचा चौरंग करा, त्याला हालहाल करून संपवा, अशा मागण्या करणे बेकायदेशीर आहे. पोलिसांनी त्यांना समज द्यायला हवी किंवा गुन्हा दाखल करायला हवा. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्या घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागावे आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावे, अशा सोयीनुसार करता येत नाही, अशी भूमिका त्यानी मांडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button