
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे विवेक पाटील यांचा सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना महाराष्ट्र दिनी (१ मे) उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या येथील त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजन जाधव, थिबा राजा कालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती रत्नागिरीचे सल्लागार सुनील आंबुलकर, पत्रकार केतन पवार उपस्थित होते.




