
चांदोरचे सरपंच, उपसरपंच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांची ४ मे रोजी घेणार भेट
रत्नागिरी : चांदोरफाटा ते ग्रामपंचायत रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून, या रस्त्यावरून गाडी चालवताना, प्रवास करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात चांदोरचे सरपंच, उपसरपंच नाचणे रोड (काजरघाटी) येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
चांदोरफाटा ते ग्रामपंचायत रस्ता शेवटची घटका मोजत असून, या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना याचा फटका बसत आहे. या खराब रस्त्यामुळे अनेकदा किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या (४ मे) सकाळी ११ वाजता नाचणे रोड (काजरघाटी) येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांदोरचे सरपंच, उपसरपंच भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच परिस्थिती निदर्शनास आणून देणार आहेत.




