मध्यप्रदेशातील एका खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना रत्नागिरी शहरात अटक


मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. कोतवाली झाबुवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंद असलेले हे आरोपी रत्नागिरी शहरात लपून बसले असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे कारवाई करत या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

दाउद चिलिया वाकला, नब्बु चिलिया वाकला आणि चिलिया कलिसींग वाकला (सर्व राहणार झाबुवा, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९१(१), १९१(२), १९१(३), १९०, १०३(१), २९६(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्हा घडल्यापासून हे तिन्ही आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button