रत्नागिरीतील स्थानिक क्रिकेट कौशल्याला वाव देण्यासाठी आयोजित ‘रत्नागिरी प्रीमिअर लीग’ (RPL) चे उदघाटन

रत्नागिरीतील स्थानिक क्रिकेट कौशल्याला वाव देण्यासाठी आयोजित ‘रत्नागिरी प्रीमिअर लीग’ (RPL) चे उदघाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्वत: बॅटिंग करून आणि खेळाडूंना शुभेच्छा देऊन केले.

यावेळी बोलतांना ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील गुणवत्तेला संधी मिळावी म्हणून या लीगचे आयोजन केले आहे. रत्नागिरीतील क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी दर्जेदार मैदाने आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नमूद केले.

​या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने क्रीडारसिक प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button