विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे नव्हे तर अंबादास दानवे उमेदवार; उद्या सकाळी दाखल करणार उमेदवारी अर्ज


विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली.उद्धव ठाकरे यांनी आपल्या जागेवर पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दानवे उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12 मे रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button