खंडाळा येथे मटका जुगारावर छापा…

रत्नागिरी ः तालुक्यातील खंडाळा-आठवडा बाजार, मच्छीमार्केट येथे पोलिसांनी मटका-जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ६६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश मोहन अवघडे (वय ४७, रा. खंडाळा कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गणेश अवघडे हे विनापरवाना मुंबई मटका जुगार चालवत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रजनिकांत घवाळी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button