खासगी कामासाठी रत्नागिरीत आलेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः खासगी कामासाठी शहरातील एका गेस्ट हाऊसमध्ये आलेल्या वृद्धाची अचानक प्रकृती बिघडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्धास तपासून मृत घोषित केले. अंकुश विठ्ठल नार्वेकर (वय ७३, मुळ रा. शिरगाव-रत्नागिरी, सध्या रा. प्रभादेवी, मुंबई) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील छाया गेस्ट हाऊस येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकुश नार्वेकर हे खासगी कामासाठी गेस्ट हाऊसला उतरले होते. त्यांची अचानक तब्बेत बिघडली. अविनाश विजय खानविलकर यांनी बेडवर झोपलेल्या अंकुश नार्वेकर यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची हालचाल दिसून आली नाही तात्काळ त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. ती आल्यानंतर रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button