भरणे दुहेरी मार्गिकेचे कामही अंतिम टप्प्यात, लवकरच सुरू होण्याची शक्यता.


भरणेपासून दापोलीपर्यंतच्या राज्य महामार्गाच्या कामाला ठेकेदार कंपनीने गती दिली आहे. या राज्य महामार्गातील भरणेपासून अण्णाच्या पर्‍यापर्यंतची एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली आहे. दुसर्‍या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून ही मार्गिकाही लवकरच खुली होणार आहे.
दुसर्‍या मार्गिकेच्या कामादरम्यान वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याकडे ठेकेधारक कंपनीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. येथील एकेरी मार्गिकेचे काम ठेकेधारक कंपनीने निर्धारित वेळेत पूर्ण करत वाहनचालकांना दिलासा दिला. दुसर्‍या मार्गिकेचे काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे.
या दोन्ही मार्गिकेपाठोपाठ शहरातील तीनबत्तीनाका ते नाना-नानी पार्क येथील दोन्ही मार्गिकेचे कामही पूर्ण केले आहे. या दोन्ही मार्गिका अद्याप वाहतुकीसाठी खुल्या झालेल्य नाहीत. खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगनजिक पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button