रत्नागिरी शहरातील भाट्ये टेबल पॉईंट बनतोय गैरप्रकारांचे केंद्र?


निसर्गाची मुक्त उधळण, अथांग समुद्राचे विलोभनीय दृश्य आणि शांततेचा अनुभव देणारा रत्नागिरी शहरातील भाट्ये टेबल पॉईंट सध्या अत्यंत धक्कादायक कारणामुळे चर्चेत आला आहे. एकेकाळी कुटुंबियांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ओळखला जाणारा हा परिसर आता अश्‍लील चाळे, मद्यधुंद पार्ट्या आणि संशयास्पद हालचालींचे केंद्र बनत चालल्याचे वास्तव समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर या ठिकाणचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाटइ उसळली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरूण-तरूणी सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन करताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच रात्रीच्यावेळी या ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणार्‍या गटांचा वावर वाढल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे टेबल पॉईंटची ओळख बदलू लागली असून रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पूर्वी सुरक्षित मानल्या जाणार्‍या या ठिकाणी आता कुटुंबासोबत जाणे टाळले जात असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांमध्येही चिंता वाढली असून, आपली मुले फिरण्याच्या किंवा अभ्यासाच्या निमित्तानेबाहेर जाताना नेमकी कुठे जातात, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरूण पिढी चुकीच्या सवयींकडे वळत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button