
गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठे यश, मात्र घरफोड्या वाढल्या
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात गुन्हेगारीचा एकूण आलेख जरी घसरला असला, तरी मालमत्ता दस्तऐवजावर डल्ला मारून चोर्यांच्या घटनांनी मात्र पोलिसांची झोप उडवली आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीत एक़ूण १ हजार ६२६ वरून १ हजार ४१० पर्यंत खाली आले आहेत. गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले असले तरी बंद घरांना लक्ष्य करणार्या चोरट्यांनी मात्र सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरवली आहे.
पोलिसांनी एका बाजूला बाजी मारली असली तरी घरफोडी आणि चोरी हे प्रकार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतआहेत. २०२५ मध्ये चोरीच्या २२८ घटना घडल्या होत्या. त्यातील निम्म्याहून अधिक प्रकरणात पोलिसांचे हात अद्याप रिकामेच आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या होणार्या घरफोड्यांचे प्रमाण १५ वरून २३ वर पोहोचले. रात्रीच्या ७९ घरफोड्यांपैकी केवळ ३३ प्रकरणांचा छडा लागला. चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला हुलकावणी देण्याचे नवे सत्र अवलंबिल्याचे दिसून येते.
शहरी भागाचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता गुन्हेगारीचा नवा पॅटर्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. महिलांवरील विनयभंगाच्या तक्रारी अजूनही शंभरी पार आहेत. तर रस्ते अपघातांचे सत्रही सुरूच आहे. तांत्रिक तपासाची व्याप्ती वाढवणे आणि मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांचा छडा लावणे हेच आता पोलिसांपुढील सर्वात मोठे लक्ष्य असणार आहे.www.konkantoday.com



