
एसटी प्रवाशांना सुखद धक्का, प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत
नमस्कार, माझे नाव विजय पाटील, मी मुंबई ते सांगली या आजच्या बस सेवेचा वाहक आहे. अशा नम्र शब्दात यापुढे कोणत्याही एसटीच्या प्रवासात आपले स्वागत होवू लाले तर आश्चर्य वाटू देवू नका, प्रवासी वाढवण्याच्या व सेवा सुधारण्याच्या एसटी महामंडळाच्या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून असा सुखद बदल होणार आहे. ताफ्यात वाढ करूनही प्रवाशांची संख्या घटत असल्याने राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी सध्या चिंतेत आहे.
त्यावर उपाय म्हणून येत्या १ मेपासून आपली बस, आपली सेवा ही राज्यव्यापी मोहीम राबवली जाणार आहे. कायमस्वरूपी राबवण्यात येणार्या या उपक्रमात, स्वच्छता, वक्तशीरपणा आणि प्रवाशांशी संवाद सुधारण्याची थेट जबाबदारी चालक आणि वाहकांवर सोपविण्यात आली आहे. या उपक्रमात एनसीएमसी कार्ड, ऍप आणि वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुकींगला प्रोत्साहन देवून डिजिटल वापराला चालना देणार आहे. तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी आगार, विभाग आणि प्रादेशिक स्तरावर नोडल अधिकार्यांची नियुक्ती केली जाईल. फेरी रद्द झाल्यास तात्काळ परतावा आणि बस नादुरूस्त झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासनही या योजनेत देण्यात आले आहे.
www.konkantoday.com




