कोकण रेल्वेचा प्रवाशांना दिलासा; चिपळूण–दिवा विशेष मेमू गाडी जाहीर


उन्हाळी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी १ मे ते ७ जूनदरम्यान त्रिसाप्ताहिक सेवा; कोकणातील अनेक स्थानकांवर थांबे


उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी कोकण रेल्वेने चिपळूण–दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU) अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावणार असल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01160 चिपळूण–दिवा मेमू विशेष दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01159 दिवा–चिपळूण मेमू विशेष रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे.
या विशेष गाडीला अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निलजे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडीत एकूण ८ मेमू डबे असणार आहेत.
अनारक्षित स्वरूपातील ही सेवा असल्याने प्रवाशांना सहज आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच कोकण रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी ‘केआर मिरर’ अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button