
सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप; राज्य सरकारने रजा, वेतन अन् कारवाईबाबत काढले आदेश
विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने आज मंगळवारपासून (ता.२१) पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व कार्यालयांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे संपकरी कर्मचाऱ्यांनाही शिस्तभंगाच्या कारवाईचा, तसेच संपकाळातील वेतन न देण्याचा इशारा दिला आहे.




