
संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावरील लोवले येथे ट्रकची समोरासमोर धडक
संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लोवले येथील वळणावर बॉक्साईट बाहतूक करणारा ट्रक आणि एलपी वाहन यांच्यात जोरदार धडक होऊन टक दरीत कोसळला. देवरुखकडून संगमेश्वरच्या दिशेने येणार्या एलपी वाहन चालकाने वळणावर आपले वाहन थेट रस्त्याच्या मधोमध आणल्याने समोरून येणार्या ट्रकशी त्याची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक थेट रस्त्याखालील दरीत कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखमार्गे संगमेश्वरला येत होते. याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबा घाटाच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच १० सीआर ३४५६) समोरून आला. लोवले येथील वळणावर एलपी वाहन चालकाने गाडी रस्त्याच्या मधोमध घातली. त्यामुळे समोरून येणार्या ट्रक चालकाला बाजू घेणे अशक्य झाल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटसह ट्रक पाच ते सहा फूड खोल दरीत कोसळला.www.konkantoday.com




