
माजी सैनिक संवर्गातून अशासकीय कर्मचारी भरती29 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी, दि. 15 ): – माजी सैनिक संवर्गातून विशेष निधीतून सहा. वसतिगृह अधिक्षक, सहा. वसतिगृह अधिक्षिका, पहारेकरी, माळी, स्वयंपाकी, सफाई कामगार या अशासकीय कर्मचारी भरती करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार रत्नागिरी येथे दिनांक 29 एप्रिल पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह चिपळूण, सैनिकी मुलांचे वसतिगृह खेड, सैनिकी मुलांचे देवरुख, माजी सैनिक विश्रामगृह रत्नागिरी, माजी सैनिक विश्रामगृह चिपळूण, माजी सैनिक विश्रामगृह खेड व माजी सैनिक विश्रामगृह दापोली येथे कंत्राटी तत्वावर माजी सैनिक संवर्गातून अशासकीय कर्मचारी भरण्यात येत आहेत. त्यासाठी माजी सैनिक असणे गरजेचे आहे. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक विधवा/अवलंबित व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा/ अवलंबित उपलब्ध न झाल्यास इतर म्हणजेच नागरी संवर्गातून सहा. वसतिगृह अधिक्षक 1 , सहा. वसतिगृह अधिक्षिक 1, पहारेकरी 5, माळी 4 पदे, स्वयंपाकी 4 पदे, सफाईकामगार 2 पद ही पदे भरली जाणार आहेत.




