गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमध्ये तब्बल ७ सिलिंडरची चोरी


सिलिंडरच्या दुष्काळात आता चोरांनी घरगुती सिलिंडर चोरीचे कारनामे सुरू केले आहेत. यामध्ये चक्क पोलीस पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ठेवण्यात आलेले दोन सिलिंडर तसेच अन्य ५ ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे अज्ञात चोरट्यांनी सिलिंडर चोरी केली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यात घरगुती सिलिंडर २५ दिवसांचे अंतर ठेवून दिले जात आहेत. तर व्यावसायिक सिलिंडर गुहागर तहसिलदार यांच्याकडे मागणी केल्यानंतर उपलब्ध होणारे सिलिंडर मागणीच्या क्रमानुसार पुरविले जात आहेत. अशामध्ये आता चोरांनी आपला डाव साधला आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये येथील पोलीसपाटीलांच्या घरातीलच चोरट्याने सिलिंडर चोरून नेले आहेत. तसेच जानवळे, शृंगारतळीतील आणखी पाच जणांचे सिलिंडर चोरीस गेले असून यामध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. बर्‍याच जणांचे सिलिंडर चोरीस गेले असून काहींनी तव-गर दाखल केलेली नाही. गुहागर पोलीस ठाण्यामध्ये संबधित पोलीस पाटील यांनी तक्रार दाखल केल्यावर पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने काही फुटेज मिळतात याची चाचपणी करत असून चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे शृंगारतळी बाजारपेठेत संरक्षणासाठी सीसीटीव्हीची उभारणी करणे महत्वाचे ठरले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button