
रत्नागिरीत महारक्तदान शिबिराला सुरुवात
रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : शिवसेना रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे.
शहरातील माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत हे शिबिर होत असून, यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळी या महारक्तदान शिबिराला सुरुवात झाली असून, यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीन बंदरकर, युवासेना प्रमुख तुषार साळवी, नगरसेविका पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, अभिजीत दुड्ये, दिशा साळवी, विनोद झाडगावकर, मिलिंद खानविलकर, ॲड. महेंद्र मांडवकर आदी उपस्थित होते.




