सिंधुदुर्गातील तरुणाचे सावर्डेतून अपहरण


१ लाख २५ हजार रुपये द्या आणि मुलाला घेऊन जा अशी धमकी देऊन सिंधुदुर्गातील सिद्धेश मारुती शिंगरे या २० वर्षीय तरुणाचे सावर्डे बाजारपेठेतून अपहरण केल्याची घटना ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली होती. याप्रकरणी चौघांवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर पोलिसांनी तपासाअंती बुधवारी त्या चौघांच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या. त्यापैकी तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी – तर एकाला जामीन मंजूर झाला आहे.
तेजस राजकुमार गायकवाड (२७), शुभम सुरेश गायकवाड (२५), राजू आत्माराम गायकवाड (६९), विनोद विजय टक्के (२६) (सर्व रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद मेघा मारुती शिंगरे (४९, कोकिसरे, वैभववाडी, सिंधुदुर्ग) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश शिंगरे व विनोद टक्के यांच्या वाहनांचा सावर्डे बाजारपेठ येथे अपघात झाला होता. त्या अपघातात झालेल्या वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कमेची मागणी सिद्धेशकडे, वरील चौघांकडून करण्यात येत होती. मात्र रक्कम न दिल्याने ते सिद्धेशला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेले होते त्यानंतर त्यांनी सिद्धेश याच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी १८ हजार, २५ हजार, २५ हजार रोख रुपये द्या व मुलाला घेऊन जा’, अशी धमकी देऊन सिद्धेशला बंदिस्त करून ठेवले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button