लांजा शहरातील सुतारवाडी येथे माळ्यावरून चिरा पडून महिलेचा मृत्यू


लांजा शहरातील सुतारवाडी आगरगाव येथे शुक्रवारी दुपारी डोक्यात चिरा पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनिता वसंत पांचाळ (वय ६७) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वनिता पांचाळ यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. शेजारी पूजा असल्यामुळे शुक्रवारी काम बंद ठेवण्यात आले होते. अशातच दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास बनिता पांचाळ या आपल्या घरातील एका खोलीत झोपल्या होत्या. त्याच वेळी माळ्यावर ठेवलेली फळी अचानक तुटल्याने त्यावरील चिरे खाली कोसळून त्यांच्या डोक्यावर चिरा पडला.
या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या चिरे पडल्याचा मोठा आवाज आल्याने शेजार्‍यांनी तत्काळ धाव घेतली. त्यावेळी वनिता पांचाळ या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button