
शाहुवाडी येथे १२ रोजी कोकण विभागातील शेतकर्यांची परिषद
शेती वाचवा वाचवा शेतकरी वाचवा परिषद ही दक्षिण महाराष्ट्र व कोकण मागील शेतकर्यांची परिषद दिनांक १ एप्रिल रोजी शाहू्वाडी जिल्हा महापुर येथे भरवली जाणार आहे. शेतकरी उध्वस्त करण्याच्या शाहीच्या धोरणाविरुद्ध एल्गार या परिषदेत केला जाणार आहे. शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग हे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील तर माजी खासदार राजू शेट्टी हे परिषदेचे उदघाटन करणार आहेत अशी माहिती चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिये यांनी दिली
यावेळी बी. के. आंब्रे, धोंडीबा कुंभार, संदीप पवार उपस्थित होते. या परिषदेचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील हे परिषदेचे स्वागताध्यक्ष असून अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरूषोत्तम शर्मा, श्रमिक शेतकरी संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र बावके (अहिल्यानगर), सचिव उद्धव शिंदे (परभणी), अ. भा.कि. म. चे समिती सदस्य व आदिवासी शेतकरी नेते किशोर ढमाले (नंदूरबार), शेतकरी कामगार पक्षाचे भाई एम व्ही.जाधव (लातूर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.www.konkantoday.com




