
एसटी चालकाला मारहाण करणार्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल…
एसटी चालकाला मारहाण करणार्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली बाजारपेठ येथे कर्तव्यावर असलेल्या एस.टी. चालकाला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. लांजा डेपोचे एस.टी. चालक मनोज भानुदास सोळंके (वय ३७) हे आपली एमएच-१४-एलएक्स-६९२७ क्रमांकाची बस घेऊन जात असताना, आरोपी आनंद माणिक सोनवणे (वय २५, रा. कोंडगाव, भिवंडी) याने त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी सोळंके यांनी आरोपीला शिवीगाळ न करण्याबाबत समज दिली असता, याचा राग अनावर झालेल्या आरोपीने चालकाला चालत्या बसमधून बाहेर ओढले. त्यानंतर त्याने चालकास मारहाण करत त्यांचा सरकारी शर्ट फाडून टाकला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.ङ्गङ्गया घटनेनंतर चालक मनोज सोळंके यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी आनंद सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com




