चिपळूणमध्ये ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ अंतर्गत माहितीपट सादरीकरण होणार


वाईल्डलाइफ अनलिमिटेड, चिपळूण (रत्नागिरी), वनविभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कै. निलेश बापट निसर्ग कट्टा अंतर्गत ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ या कार्यक्रम मालिकेतील ‘पर्ण ४’ आयोजित करण्यात आला आहे.

या अंतर्गत ‘लाईफ फोर्स : इंडियाज वेस्टर्न घाट्स’ या विषयावरील सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार श्री. नल्ला मुत्थु यांच्या माहितीपटाचे सादरीकरण होणार आहे.

हा कार्यक्रम मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता निसर्गसेवक कै. निलेश बापट छायाचित्रदालन, वनभवन, प्रभात रोड, मार्कंडी, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.

निसर्ग आणि वन्यजीवांबद्दल आवड असणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button