चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्ग २७ मार्चपासून ६० दिवसांसाठी बंद


पाटण शहरातून चिपळूण-कराड जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील धांडे पुलाची पुनर्बांधणी तसेच बाजारपेठेतील कॉंक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २७ मार्च रात्री १२ वाजल्यापासून हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ६० दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार २७ मार्च रोजी रात्री १२ पासून ते २७ मे रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल लागू राहणार आहे. यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणून कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक ही कराड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे पाचवड फाटा-उंडाळे कोकरुड-मलकापूर-आंबा घाट-संगमेश्वर मार्गे चिपळूणकडे वळवण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना बुधवारी जारी केली आहे. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणार्‍या अवजड वाहतुकीमध्ये चिपळूण- संगमेश्वर-आंबा घाट-मलकापूर-कोकरुड-उंडाळे-पाचवड फाटा-राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ मार्गे कराड व उंब्रजकडे जाईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button