नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील वृद्धाची १८.३७ लाखाची ऑनलाईन फसवणूक


शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देतो, या आमिषाला बळी पडून तालुक्यातील गव्हे लोहारवाडी येथील दिगंबर दौलत हरेकर (७२) यांची तब्बल १८ लाख ३७ हजार ४८९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १० डिसेंबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हे लोहारवाडी येथील दिगंबर हरेकर यांना मयंक सिंग नावाच्या व्यक्तीने फोन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर ’प्रॉक्सटेंड’ नावाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोबाईल स्क्रीन शेअर करून घेतली.
याच प्रक्रियेत आरोपीने हरेकर यांची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांना डॉलरमध्ये ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त केले. ’जास्त गुंतवणूक, जास्त नफा पा सूत्राने वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. टेलिग्राम व ई-मेलद्वारे संपर्क ठेवत आरोपीने ऑनलाईन व्यवहार करून घेतले. १० डिसेंबर २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हरेकर यांच्याकडून एकूण १८ लाख ३७ हजार ४८९ रुपये उकळून आरोपीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button