
राजापूर नगरपरिषदेच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात एक अनोखा उपक्रम…
राजापूर : राजापूर नगरपरिषदेच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘नाशिक रॉयल वॉरियर’ यांच्या वतीने २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राजीव गांधी मैदान येथे पार पडणार असून सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.
या १० दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागींस लाठी-काठी, तलवारबाजी तसेच पारंपरिक मर्दानी खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळकटी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात पारंपरिक युद्धकलेचा वारसा जपण्याची गरज अधोरेखित होत असून, या उपक्रमामुळे तरुण पिढीला शिवकालीन शौर्य, शिस्त आणि स्वाभिमान यांची ओळख होणार आहे. आयोजकांनी नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सोबतच्या लिंक वर जाऊन नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . https://sites.google.com/view/bolkasjekjgsndfcr/home
शिबिरासाठी नोंदणी ऑनलाइन लिंकद्वारे सुरू असून जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असेही आयोजकांनी आवाहन केले आहे.



