चिपळूण शहरातील मार्कंडी येथील तिरुमला परिसरात लोकवस्तीत घुसलेली मगर जेरबंद


चिपळूण शहरातील मार्कंडी येथील तिरुमला परिसरातील मंगळवारी लोकवस्तीमध्ये मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वन विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून मगरीला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तिरुमला परिसरातील रहिवासी संदेश शेलार यांना मगरीचे दर्शन होताच तत्काळ वन विभागाला कळवले. माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्याधुनिक साधनसामग्रीच्या मदतीने मगरीला जेरबंद करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशानुसार मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले. ही संपूर्ण बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई-पाटील, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या नेतृत्वाखाली वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर), कृष्णा इरमले (कोळकेवाडी) तसेच शिवराज शिर्के, अजय बडदे व सुरेंद्र भोंडवे यांनी सक्रिय सहभाग घेतला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button