यूपीएससीत मराठी माध्यमाचा एकही नाही

यंदाच्या निकालातील वाचन-लेखन कौशल्याअभावी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा टक्का घसरला . यूपीएससीत एकही मराठी माध्यमाचा एकही नाही ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे.
वाचन आणि लेखन कौशल्याअभावी मराठी उमेदवार मागे राहत असल्याचे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदवले आहे.‘ यंदा साधारण ३३ उमेदवारांनी मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा दिली. त्यातील केवळ दोनच मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि एकाही उमेदवाराची अंतिम यादीत निवड झाली नाही,’ अशी वस्तुस्थिती चिंताजनक आहे. .महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मुख्य परीक्षा दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मराठीतून मुख्य परीक्षा देणारे नाव अंतिम निवडयादीत दिसत नसल्याचे चित्र अधोरेखित होत आहे. 
 मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भारतीय भाषांमध्ये उत्तरे लिहण्याची मुभा असते. प्रश्न मात्र इंग्रजी आणि हिंदीत असतात. त्यात इंग्रजी भाषेची आणि हिंदी किंवा निवडलेल्या भारतीय भाषेची पात्रता परीक्षा घेण्यात येते. तसेच, सामान्य अभ्यासक्रमाचे चार आणि वैकल्पिक विषयांच्या दोन प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायच्या असतात.
 ‘अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये कष्ट घेण्याची तयारी कमी होताना दिसते आहे .वाचनाची सवय नसल्याने लेखन कौशल्यातही फारशी गती अवगत नसते .‘ यास्तव यूपीएससी’मध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थी मागे पडतात. विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठी व्हिडिओ बघण्याकडे कल आहे. त्यामुळे लिखाणाचा आवश्यक सराव होत नाही,’ ‘इंग्रजी आणि गणिताच्या मूलभूत कौशल्यांच्या अभावामुळे पूर्वपरीक्षेचा अडथळा पार करण्यात मराठी विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत . त्यातूनही एखाद्याने मराठीतून मुख्य परीक्षा दिलीच, तर इंग्रजीच्या तुलनेत फारशी तयारी नसते. अलीकडे दर्जेदार संदर्भही मराठीत उपलब्ध आहेत. मात्र, प्रयत्नांमधील सातत्य आणि लिखाण कौशल्याच्या अभावामुळे मराठी विद्यार्थी मागे पडतात,’ ‘मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना कमी वेळेत सगळी उत्तरे लिहिण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत लागतात . उलट, इंग्रजीत पेन न उचलता अधिक गतीने लिहिता येते.’   लेखन कौशल्याच्या अभाव, इंग्रजीचा न्यूनगंड, भाषांतरावर भर आणि ‘यूपीएससी’ने वाढवलेली ‘सीसॅट’ची काठिण्यपातळी, यामुळे ही संख्या दिवसेदिवस कमी होताना दिसत आहे,’
’‘कमी वेळेत आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडायचा असतो, त्या वेळी भाषिक कौशल्यांचा कस लागतो. इंग्रजीतून ‘की-वर्ड्स’ आणि जास्तीत जास्त मुद्दे लिहिता येतात, असा कल आहे.
’मात्र, अंतिम निवड करताना प्रत्यक्ष आयुष्यातील आणि व्यवस्थेतील आव्हाने समजून त्यावर काम करणारे निवडले जातात. त्यासाठी प्रशासक म्हणून सोप्या भाषेत आपले मुद्दे पटवून द्यायचे असतात. मराठीतून ही मांडणी अधिक चांगल्या पद्धतीने करता येते, स्थानिक संदर्भ देता येतात, विचार आणि लिहिण्यातील अंतर कमी होते.
’भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्याही मराठी माध्यम सोयीचेच आहे .तसेच, मराठीतूनही इंग्रजीप्रमाणेच यश मिळवता येतेच. कोणत्या भाषेत विषय अधिक चांगल्या पद्धतीने सांगता येतो, हे ठरवण्याची गरज आहे .
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने मातृभाषेतून शिकण्याचा कितीही आग्रह केला असला, तरी मराठीची गळचेपी मराठी माणूसच करतो आहे.
यूपीएससी अंतिम निवड यादीत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणारा एकही विद्यार्थी यंदा नाही, .अलीकडे ८६ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण आहे . घसरत चाललेला मराठी शाळांचा दर्जा आणि संख्या ही तशी वरवरची कारणे. खरं पाहता मराठी भाषिकांच्या हातातून निसटत चाललेली मराठी भाषेविषयीची आस्था हा चिंतेचा विषय आहे .मराठीचे पाट्या लावणे ही केवळ मलमपट्टी आहे. निमित्त शोधून राजकीयीकरण, याने साध्य काही होणार नाही, याचे भान येईल, तेव्हा मराठी भाषेला चांगले दिवस येतील.
मराठीच्या र्‍हासाबद्दलच्या विश्लेषणापूर्वी आधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत मराठी माध्यमातून मुख्य परीक्षा देणारे उमेदवार का प्रकर्षाने दिसत नाहीत, याबद्दल थोडे. आकडेवारी तपासली, तर दिसते, की दशकभरापूर्वी मराठीतून मुख्य परीक्षा देणार्‍या उमेदवारांची शंभराच्या घरात असलेली संख्या हळूहळू उतरणीला लागून पुढील चार-पाच वर्षांत निम्म्यावर आली. ती आणखी कमी होऊन २०२० नंतर ३० च्या आसपास राहिली आहे. त्यातून पुढे मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत जाणारे आणखी कमी आणि निवड होणारे नगण्य, असे हे चित्र.
वास्तविक मुख्य परीक्षा मराठीतून देऊन उत्तम गुणानुक्रम पटकावून सनदी अधिकारी झालेल्यांची भूषण गगराणी, कौस्तुभ दिवेगावकर अशी उदाहरणे उमेदवारांच्या डोळ्यांसमोर ठळकपणे आहेत. कारण, या स्थितीच्या शोध घेता भाषेबद्दलच्या अनास्थेच्या मुद्द्यापर्यंत नेऊन सोडणारे असते. लेखन-वाचन कौशल्यांचा अभाव हे त्यातील प्राथमिक. शिकलेले, कळलेले आपल्या शब्दांत उतरवण्यासाठी स्वभाषेचा आधार कधीही हवाहवासा. पण, अनेकांना अभिव्यक्तीसाठी ती अपुरी पडते आहे. शिवाय, इंग्रजीत लिहिले, तर गुण अधिक मिळतील, त्या भाषेत मार्गदर्शन आणि संदर्भाची मुबलकता अधिक आहे, अशा समजुती मराठीपासून दूर जाण्यासाठी पूरकच.
तसेही भ्रमणध्वनी स्मार्ट झाल्यापासून वाचनाची साधने बदलली आणि पाहण्यावर अधिक भर दिला जाऊ लागला. जेव्हा लिखित स्वरूपात मांडायची वेळ येते, तेव्हा गोंधळ उडतो. साधने भले भरपूर उपलब्ध असतील, अगदी मराठीतही आहेत. पण, दृष्टिकोन कोठून आणणार? आता खरे तर आकलन झालेले स्वभाषेत उतरवणे अधिक सोपे. पण, घरगुती संवादापासून सांस्कृतिक व्यवहारापर्यंत झालेली मराठीची दैना ना भाषिक समृद्धी आणते, ना आकलनाची यत्ता उंचावते. कसे उतरणार ते लिखाणात?
आणि मग आपण येऊन पोचतो ते मराठीच्या सार्वत्रिक घसरगुंडीपर्यंत. एकोणिसाव्या शतकात विचारवंत, ज्ञानवंतांनी लेखन आणि भाषण-संभाषणाचे माध्यम मराठी ठेवून ती दृग्गोचर केली. विसाव्या शतकाच्या पहाटे कवी, गीतकार, संगीतकारांनी भाषेला आणखी लालित्य आणले. स्वातंत्र्यानंतर वकिली, वैद्यक व्यवसाय, राजकारण, प्रशासन अशा बहुविध क्षेत्रांत उच्च पदापर्यंत पोचलेल्या अनेकांनी बराच काळ सार्वजनिक व्यवहार मराठीत केल्याने मराठी ही ज्ञानाच्या देवाण-घेवाणीची भाषा होती. जागतिकीकरणानंतर, नव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र त्याला उतरती कळा लागल्याचे दिसते.
बाजारपेठीय रेटा हे एक कारण असू शकते . क्रयशक्ती वाढलेल्या मराठी आणि त्यातूनही विशेषत: मध्यमवर्गीय मराठी समाजाने आपल्या रोजच्या आयुष्यातील अशा घुसखोरीला ना प्रतिकार केला, ना बाजारीकरण थांबवले. तो फक्त त्याला आलेले आर्थिक समृद्धी गोंजारत राहिला. इंग्रजी बरोबर कॉर्पोरेट रोजगाराच्या मागे धावत राहिला .
नोकरी-व्यवसायाच्या मुलाखती, बैठका इंग्रजीत, ‘इंग्रजी सुधारते’ म्हणून घरगुती मनोरंजनातील एखादी दूरचित्रवाणी मालिका इंग्रजीच आणि प्रतिष्ठेची लक्षणे म्हणून संभाषणाचे पर्यायही इंग्रजीच. जगण्याच्या अवकाशात मराठीची झुल ‘टिकविण्या’साठी खोलीत धडपडत सुरु झाली.साच्यातील मराठी नाटके, संगीताचे दिवाळी पहाट’ कार्यक्रम वार्षिक तोंडी लावण्यासाठी असतातच. मध्यमवर्गाचे मराठीप्रेम हे असे निवडक जुन्याचे स्मरणरंजन पुरते मर्यादित राहिले .त्यांचा दैनंदिन व्यवहार भाषेच्या सरमिसळीचाच आहे. त्यात अलीकडे मराठीतील बोलींच्या अस्मिताही अचानक कधी तरी टोकदार होताना दिसतात. पण, त्याला छान भाषिक अंगाने वळण मिळताना काही दिसत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणे वाईट, असे सरसकटीकरण करण्यातही अर्थ नाही. पण, अभिव्यक्तीच्या सुरुवातीच्या इयत्तेत स्वभाषेचा अभाव एकूणच भाषिक अपंगत्वाकडे आणि त्यातुन भाषिक र्‍हासाकडे नेणारा असतो, हे निखळ सत्य आहे .
थोडक्यात भाषा व्यवहारही भोंगळ. तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ देवनागरीत लिहिले म्हणजे मराठीचे भरणपोषण कसे होईल? भाषेतून विचार, भावना व्यक्त व्हायला हवी .
मराठीची गळचेपी ही अशी मराठी माणूसच करतो आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उमेदवारांनी मुख्य परीक्षा मराठी माध्यमातून न देणे किंवा तशी ती दिलेल्यांना यश न मिळणे, हा त्याचा परिणाम.
:मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत, ही गंभीर बाब आहे. गेल्या काही वर्षांत या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक शाळा शेवटची घटका मोजत आहेत .
महाराष्ट्रातच मराठी शाळा संपुष्टात आल्या, तर अभिजात मराठी भाषेच्या दर्जाचे काय होईल? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मराठी शाळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
राज्यकर्त्यांमध्ये मराठी एक लोकभाषा, व्यवहार भाषा आणि ज्ञानभाषा होण्याचे दृष्टीने प्रयत्नांचा अभाव दिसतो.मराठी शाळांचे खच्चीकरण आणि इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण आता खेड्यापाड्यात पोहोचले आहे. शासन १४९८५ मराठी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत “
“मराठी ज्ञानभाषा झाली तरच ती इंग्रजीशी टक्कर घेऊ शकेल. १३०० वर्षाची मराठीची समृद्ध परंपरा असलेले १० कोटी लोक जगातील १०० देशांमध्ये पसरलेले आहेत. दरवर्षी दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. छोटी-मोठी दोनशे साहित्य संमेलने होतात. सातवाहन, राष्ट्रकूट आणि मराठे असे मराठी राज्यकर्ते भारतभर राज्य करीत होते.
इंग्रजी भाषा अभिजात नाही, परंतु ती वर्तमानाची आणि भविष्याची भाषा आहे. भाषा प्रवाही राहून अधिकाधिक वापरली तर अधिक समृद्ध होते. मराठी भाषा रोजच्या व्यवहाराची ,शिक्षणाच्या माध्यमाची आणि जगण्याची भाषा बनेल तरच मराठीला प्रतिष्ठा मिळेल .”
ॲड विलास पाटणे
उपाध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button