
जयगड खाडीवर ७५० कोटींचा पूल साकारणार
कोकण किनारपट्टीवरील प्रवासाचे अंतर कमी करण्यासोबतच पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कबर कसली आहे रेवस-रेड्डी या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा असलेला सांडेलावगण-तवसाळ पूल आता प्रत्यक्षात येत आहे. जयगड खाडीवर उभारण्यात येणारा हा पूल रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल.
सुमारे ७५० कोटी रुपये खचून उभारण्यात येणारा हा पूल अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असणार आहे. या पुलाची एकूण लांबी अडीच किलोमीटर असून, तो खाडीच्या पाण्यापासून तब्बल ३५ मीटर उंचीवर असेल. एवढ्या उंचीमुळे खाडीतील मोठ्या जहाजांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. या अवाढव्य पुलाचा डोलारा पेलण्यासाठी खाडीत आणि किनार्यावर एकूण ३३ पिलर (खांब) उभारले जाणार आहेत पुलाच्या मुख्य सरचनेसोबतच दोन्ही बाजूंना अडीच मीटरचे जोड रस्ते तयार करण्यात येणार आहेत, ज्यामुळे मुख्य महामार्गावरून पुलावर येणे सोयीचे होईल.
या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण केली जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी आणि सांडेलावगण या दोन गावांमधील जमिनी या प्रकल्पासाठी संपादित केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून भूसंपादनाचा मोबदला म्हणून ३१ कोटी रुपयांचा निधी आधीच जमा करण्यात आला असून, प्रकल्पग्रस्तु, शेतकर्यांना आणि जमीन मालकांना त्याचे वितरणही सुरू झाले आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामात कोणताही तांत्रिक किंवा कायदेशीर अडथळा उमगलेला नाही. कंपनीकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
www.konkantoday.com




