
रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे रिक्षा, दुचाकी चालकांच्या वादातून जोरदार राडा
रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे ओव्हरटेक केल्यावरून रिक्षाचालक व दुचाकीस्वार यांच्यात वाद उफाळून आला ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाला मारहाण केल्याने दोन्ही बाजूकडील गट एकमेकांसमोर आले होते दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला करत बघ्यांनाही लाठीचा प्रसाद दिला.
चर्मालय याठिकाणी दुचाकीस्वाराने रिक्षाला ओव्हरटेक केले असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारहाण केली. यावेळी रिक्षाचालक १ व दुचाकीस्वार यांचे समर्थक देखील घटनास्थळी दाखल झाले वाद वाढत गेल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. तसेच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी देखील होती.
वादाची माहिती मिळताच, रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले बर्मालय येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने वादाच्या घटनेमुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीमारदेखील केला. तसेच राडा करणार्या दोन्ही बाजूकडील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com




