प्रभाग १५ मधील सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले; नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक १५ मधील आठवडा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालय आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या शौचालयाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी मुख्याधिकारी गारवे साहेब, भाजपाचे उपनगराध्यक्ष समीर तीवरेकर, तसेच शिवसेना-भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभागातील नागरिकांच्या स्वच्छता व मूलभूत सुविधांचा विचार करून हे सार्वजनिक शौचालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे आठवडा बाजार परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी मान्यवरांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन करत अशा सुविधा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सांगितले.

प्रभागाच्या विकासासाठी अशा उपक्रमांना पुढेही चालना दिली जाईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button