शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खेड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे एसटीचे चालक वाहक यांच्या कामात अडथळा आणून मारहाण केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सनी संजय नलावडे व कौस्तुभ पाटणे (दोघेही रा. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल (१६ मार्च) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद महादेव माने (वय ४२, चालक-वाहक- रोहा एसटी आगार, रा. मु. पो. नेरले, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. रोहा एसटी आगार) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (क्र. एमएच १४ केक्यू ३९७०) चिपळूण ते खेड अशी घेवून येत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे समोरून येणारी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा गाडीच्या (क्र. एमएच ४६ एयू ३७१७) चालकाने त्याच्या वाहनाची लाईट फियादी श्री. माने यांच्या डोळ्यावर मारली. त्यावेळी फिर्यादी यांनी अपर डीपर लाईटचा इशारा दिला; परंतु आरोपीने त्याच्या गाडीचा प्रकाश कमी केला नाही. उलट संशयित आरोपी सनी नलावडे व कौस्तुभ पाटणे या दोघांनी एसटी बसच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघ‌डून फिर्यादी यांना बाहेर ओढून हाताच्या चापटाने कानाखाली मारहाण केली. तसेच त्यांना खाली पाडून मारहाण केली. यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याला तसेच डोक्याला जखम होऊन दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button